नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जमिनीवरील रस्ते विकासाची कामे करण्यात येतात.
शहरांतर्गत सार्वजनिक दळणवळणाच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी आवश्यक सुविधा
पुरवण्यात येतात.
रस्त्याच्या कडेने फूटपाथ बांधणे, गटार बांधणे इत्यादी कामे करण्यात येतात.
इमारती: सार्वजनिक उपयोगाच्या इमारती उदा. वाचनालये, प्रशासकीय कार्यालये,
व्यायामशाळा, व्यापारी संकुले, नाट्यगृहे, स्टेडियम, पोहण्याचे तलाव बांधण्यात येतात.